वधू वरांच्या कुंडली पेक्षा कर्तुत्वाला महत्त्व द्या :- वसंतराव मुळीक

कोल्हापूर(प्रतिनिधी) प्री-वेडिंग बंद करण्याची मागणी
अखिल भारतीय मराठा महासंघचा वधू वर पालक मेळावा उत्साहात राजर्षी शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाला
यावेळी मेळाव्यात सर्वांचे स्वागत चंद्रकांत चव्हाण यांनी केले.प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी वधु वर मेळावा घेणे ही काळाची गरज बनली आहे आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी अशा वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.यावेळी बोलताना मराठा महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले सध्या विवाह प्रसंगी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो हा खर्च न करता वधू वरांच्या भावी जीवनासाठी राखीव ठेवावा जेणे करून त्यांना या रकमेचा फायदा पुढील जीवनात झाला पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे प्रेरणास्थान असून विवाह प्रसंगी त्याचा पुतळा पुजन करून स्मरण करने ही जमेची बाजू असून स्फुर्ती देणारीही आहे. त्यांनी व्यक्ति म्हणून केलेला पराक्रम संपूर्ण जगाला आदर्श आहे अशा या पराक्रमाला दैवत्व दिले तर छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व संपेल. तरी समाजाने विवाहप्रसंगी व विविध कार्यक्रमा प्रसंगी शिवरायांचे पुजन करावे पण आरती करण्याचा नवा पायंडा पाडू नये असा ही ठराव करण्यात आला. त्याचबरोबर लग्नाआधी प्री-वेडिंग करत आहेत यामुळे विवाहपूर्व प्री-वेडिंग चे अनेक मुलींना दुष्परिणाम भोगावे लागले. मराठा समाजाने विवाहपूर्वी प्री-वेडिंग करू नये किंवा केलेस प्रदर्शन करू नका असा एकमुखी ठराव अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वधू वर मेळावा प्रसंगी केला.अनेक पालकांनी मत व्यक्त केली यामध्ये अधार्मिक दोनदा अक्षदा पद्धत बंद करावी.लग्नाचा इव्हेंट न करता कमीत कमी खर्चात विवाह करा. कुंडली पेक्षा कर्तुत्वाला महत्व द्या 96 कुळीचा पाहू नको , मुलगा मुलगी भेद नको अश्या पालकांनी सूचना केल्या यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सद्य परिस्थितीत मुलांची विवाह वयोमर्यादा 30 ते 40 पर्यंत गेल्याने पालक हवालदिल झाले आहेत अशा वेळी पर जिल्ह्यातून होणारी फसवणूक टाळावी यासाठी पालकांनी सावध राहावे. यानंतर जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी मराठा महासंघाच्या कार्याचा आढावा घेतला मुला मुलींची लग्नाची वये ३५ पेक्षा जास्त वाढत असून मुलांच्या पालकांचे परजिल्ह्यातून आर्थिक फसवणूक होत आहे झाली आहे यामध्ये समाजाने एकत्रित लक्ष घालून लग्ने ठरविली पाहिजेत. लग्नावेळी येऊ घातलेली दोन अक्षता ही पद्धत पूर्णपणे चुकीची असून ती बंद करावी
असेही वसंतराव मुळीक यांनी सांगितले.
यावेळी अनेक पालकांनी विवाह जुळवीताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते अश्या भावना व्यक्त केल्या.
सूत्रसंचालन युवक जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील व प्रतीक साळुंखे यांनी केले
यावेळी शंकरराव शेळके, प्रकाश जाधव, शिवाजी मोरे, डॉ लक्ष्मीकांत नलवडे, जयसिंगराव हवालदार, प्रताप नाईक,सचिन इंगवले, अनिल पाटील, शिवाजी वारके, संयोगिता देसाई, यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .