भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सोमवारी सांगली दौऱ्यावर

पक्षप्रवेश, कार्यकर्ता मेळावे आणि सदिच्छा भेटींचा कार्यक्रम
सांगली (प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांचा ते अध्यक्ष झाल्यावर प्रथमच सोमवार (दि.११) ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्याचा झंझावाती दौरा होणार आहे. दौऱ्याची सुरुवात पेठ (जि. सांगली) येथील वनश्री दूध संघ शेतकरी मेळाव्यातील सहभागाने होणार आहे. त्यानंतर जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट व उरण इस्लामपूर येथे भाजपा सांगली ग्रामीण जिल्हा कार्यकर्ता बैठक होणार आहे.
यानंतर सांगली मध्ये, सांगलीचे आराध्य दैवत श्री गणपती चे दर्शन, आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट, भाजपचे बांधकामाधीन शहर व ग्रामीण कार्यालयाची पाहणी, माजी मंत्री सुरेशभाऊ खाडे तसेच झोपडपट्टी निर्मूलन समिती अध्यक्ष सुजितकुमार काटे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेटी होतील. संध्याकाळी संजयनगर येथे जिल्हा कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडेल. यानंतर हॉटेल देवगिरी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
रात्री विश्वजीत पाटील, भुपाल सरगर आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटी देऊन चव्हाण मुंबईकडे प्रस्थान करतील. त्यांच्या या दौऱ्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आणि सम्राट महाडिक यांच्यासोबत पक्षाचे राज्य आणि जिल्हा स्तरावरील पदाधिकारी, आजी माझी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी असणार आहेत. या दौऱ्यात सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट असून पक्ष संघटन बळकटीसाठी हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. या सर्व कार्यक्रमांना कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी केले आहे.