रौप्यमहोत्सवी वर्ष व स्वातंत्र्य दिनानिमित्त आशा होमिओपॅथिकतर्फे मिरजेत आरोग्य शिबिर

मिरज (प्रतिनिधी)
आशा मल्टिस्पेशालिटी होमिओपॅथिक क्लिनिक, मिरज यांच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य होमिओपॅथिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ११ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत बँक ऑफ इंडिया शेजारी, छत्रपती शिवाजी महाराज रोड येथे भरविण्यात येणार आहे.
शिबिरामध्ये सर्व प्रकारचे कॅन्सर, ऑटीझम, गतिमंद/मतिमंद, किडनीचे विकार या सारख्या गंभीर आजारांवर तज्ज्ञांकडून मोफत तपासणी व सल्ला मिळणार आहे. औषधांवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत असेल. नोंदणी शुल्क फक्त १०० रु. असून इच्छुक आगाऊ नोंदणी ८९२८१३११११, ७८७५१४११११ या क्रमांकावर करू शकतात, अशी माहिती आशा होमिओपॅथीचे संचालक डॉ. बी.एस. भोसले यांनी दिली आहे.