रोटरीच्या माध्यमातून मिरज हायस्कूलला २५ कॉम्प्युटर व १६ डिजिटल बोर्ड मिळणार – राजेंद्र नागरगोजे

मिरज (प्रतिनिधी)
येथील शंभर वर्षांपूर्वीची जुनी मिरज हायस्कूल या शाळेला रोटरी क्लब ऑफ टेक्स्टाईल च्या माध्यमातून २५ कॉम्प्युटर मिळणार असल्याचे तसेच कॅनडामधील एका माजी विद्यार्थ्यांनी एक हजार डॉलरची मदत रोटरीच्या माध्यमातून पाठवत असल्याची माहिती मिरज हायस्कूलचे मुख्यध्यापक रोटेरियन राजेंद्र नागरगोजे यांनी दिली. ते रोटरी क्लब ऑफ मिरज तर्फे आयोजित इंटरनेट क्लब ऑफ मिरज हायस्कूलच्या नियोजन मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी रोटरी क्लब ऑफ मिरज चे माजी अध्यक्ष रवींद्र फडके, विद्यमान सचिव ज्ञानराज सावंत, जीवन रक्षक समितीचे अध्यक्ष सुधीर गोरे, मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे, जीवन विद्या मिशनच्या डॉ. माधवी पटवर्धन व ॲड. पुजारी, रोटरॅक्ट क्लब विश्रामबागचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. राजेंद्र नागरगोजे पुढे म्हणाले की, गेल्या ७ वर्षांपूर्वी या शाळेची अवस्था खूपच बिकट होती. परंतु सात वर्षांपूर्वी रोटरी क्लब ऑफ टेक्स्टाईल ने ऐंशी लाख रुपयाची मदत देऊ शाळेची पुनर्बांधणी केली. तसेच येत्या एक महिन्यात मिरज हायस्कूल मिरज मध्ये अद्यावत असा कॉम्प्युटर लॅब सुरू करण्यात येणार असून त्यासाठी २५ कॉम्प्युटर, प्रिंटर, प्रोजेक्टर आदी साहित्य देण्यात येणार आहे.
रोटरी क्लब ऑफ मिरज पुरस्कृत इंटरॅक्ट क्लब ऑफ मिरज हायस्कूल च्या माध्यमातून जीवन विद्या मिशनच्या सहकार्याने मिरज हायस्कूल मिरज मध्ये दर शनिवारी सकाळी आठ वाजता संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे . तसेच स्कूलच्या माध्यमातून २५ शाळांमध्ये असे संस्कार शिबिर सुरू करता येऊ शकतील अशी ही माहिती राजेंद्र नागरगोजे यांनी दिली. संयोजन इंटरॅक्ट क्लब ऑफ मिरज हायस्कूल च्या सह समन्वयक परविन नदाफ मॅडम यांनी केले.