मुस्लिम प्रार्थनास्थळांना स्पीकरला परवानगी द्या ; समाजाच्यावतीने पोलिस अधिक्षक घुगेंना निवेदन

मिरज (प्रतिनिधी)
मुस्लिम समाजाच्या प्रार्थनास्थळांना नियमाधीन राहून स्पीकर लावण्यास परवानगी मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप घुगेंना मुस्लिम समाजाने केली आहे. यामध्ये न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादेत राहुन ठरविक डेसीबल प्रमाणे आवाज ठेवून स्पीकर लावण्यास परवानगी द्यावी. ध्वनी प्रदुषण होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाईल.
परवानगीची मागण केल्याास पोलीस निरीक्षक परवानग्या देत नाहीत. कायद्याचे पालन करण्यासाठी नियमाच्या अधीन राहू परवानगी मिळावी अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी मुस्लिम समाजाचे आसिफ बावा, जब्बार बारसकर, मुश्ताक रंगरेज, इकबाल मुल्ला, हाफीज सद्दाम सय्यद, सुफियान पठाण, इम्तियाज शेख, युसुफ मिस्त्री, शहाबाज नायकवडी, मुनीर पत्तेकरी, अक्रम शेख, टिपू इनामदार, इम्रान जमादार, हाजी मुबारक सनदी उपस्थित होते.