मिरजेतील एमटीडीके शैक्षणिक संकुलचा १५ वा वर्धापन दिन उत्साहात

मिरज (प्रतिनिधी)
येथील एमटीडीके शैक्षणिक संकुलचा १५ वर्षे प्रतिपूर्तीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन एम. एस .स्वामी व शीतल घुगे हे उपस्थित होते.
या वर्धापन दिनाचे व १५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत व संस्थेच्या कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीचा आढावा विद्यार्थी, पालक व इतर मान्यवरांपुढे मुख्याध्यापिका संगीता पाटील यांनी वाचून दाखवला. स्कूलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती सुशांत खाडे यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यातील काही शैक्षणिक आराखडा असल्याचे सांगितले. यामध्ये प्रामुख्याने AI, रोबोटिक, मल्टी स्किल यासारखे अद्यावत ज्ञान देण्यासाठी जरुरी असणाऱ्या प्रयोगशाळा व तज्ञ सज्ज असल्याचे सांगितले.
वर्धापन दिनाचे औचित्य साधत संस्थेच्या गुणवत्तेच्या व संस्थेने दिलेल्या सोई – सुविधांच्या आधारावर शाळेला ISO मानाकंन मिळाले आहे. तसेच आजच्याच दिवशी MTDK शैक्षणिक संकुल व MTDK RUN यांचे लोगो नोंदणीही करण्यात आली. तसेच यावेळी संस्थेने आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार संगीता पाटील, आदर्श शिक्षकांमध्ये आकाश पांढरे, सायली कुलकर्णी, आदर्श कर्मचाऱ्यांमध्ये सारिका माने, विजय अकिवाटे, आदर्श पालकांमध्ये आण्णा चौगुले, लक्ष्मी जुगळे तर विद्यार्थ्यांमध्ये गोविंद खोत, पियूष गरड आदींना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा आ. डॉ. सुरेश भाऊ खाडे, उद्योजक व संस्थेचे संचालक अशोक खाडे, सुमनताई खाडे, रसिका खाडे यांनी संस्थेविषयी गौरवोद्गार काढून पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शाहीन शेख, सुरेखा शेख, मुस्तफा मुजावर, नाटककार राजेंद्र पोळ, साहित्यिक महेश कराडकर, प्रशांत कुलकर्णी, वेट लिफ्टिंग असोसिएशनचे मयूर सिंहासने, टेक्सपॉट इन्फोटेक कंपनीचे मालक अविनाश सकट आदी मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.