मिरजेत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात झोपून आंदोलन

0
WhatsApp Image 2025-08-19 at 6.56.58 PM (1)

मिरज (प्रतिनिधी)

२७ तारखेला गणरायाचे आगमन होणार आहे. मिरजेत अनेक चौकात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मिरज शहरातुन गणपती ची भव्य मिरवणूक निघते, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मिरवणुकीला अडतळा होणार आहे. त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करावेत या मागणी साठी आणि मिरजेतील रस्त्यावर पडलेल्या खड्यांच्या विरोधात आरपीआय आठवले पक्षाचे वाहतूक आघाडीचे शहर जिल्हा अध्यक्ष आनंदा हत्तेकर यांनी मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पावसाचे साचलेल्या पाण्यात झोपून अनोखे आंदोलन केले आहे.

काही दिवसात गणपतीचे आगमन होणार असून अनेक भाविक मिरजेत मिरवणुक पाहायला येत असतात. मोठ मोठ्या गणपतीच्या मूर्तिची मिरवणुकी निघत असते, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्या मुळे मूर्तीला दुखापत झाली तर याला कोण जबाबदार आहे.असा आरोप करत हत्तेकर यांनी इशारा दिला आहे. येत्या दोन दिवसात महापालिकेने रस्ते दुरुस्त केले नाहीत तर उग्र आंदोलन करू असा इशारा RPI आठवले पक्षाचे वाहतूक आघाडी चे शहर जिल्हा अध्यक्ष आनंदा हत्तेकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *