मिरजेत भाजपची दहीहंडी तासगावच्या ‘शिवाजी’ संघाने फोडत केली हॅट्ट्रिक

आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे युवा मंचच्या वतीने उत्कृष्ट नियोजन
मिरज (प्रतिनिधी)
कोसळत्या पावसात विक्रमी सात थर लावून चढाई करत तासगावच्या शिवाजी गोविंदा पथकाने भारतीय जनता पार्टी, आ. सुरेशभाऊ खाडे, सुशांत खाडे युवा मंचच्या वतीने आयोजित १ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची दहीहंडी फोडली. सलग तिसऱ्या वर्षी दहीहंडी फोडून या मंडळाने हॅट्रिक केली. उपस्थित तरुणाईने एकच जल्लोष केला.
यावेळी माजी मंत्री आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. सत्यजित देशमुख, सुरेश आवटी, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, संघटन मंत्री मकरंद देशपांडे, सुशांत खाडे, माजी आमदार नितीन शिंदे, शेखर इनामदार, धीरज सूर्यवंशी प्रमुख उपस्थित होते. मिरज हायस्कूलच्या क्रीडांगणावर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेत्री सोनाली पाटील यांनी नृत्य अविष्कार सादर केला. दहीहंडी पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने मिरज मतदारसंघातील कार्यकर्ते आणि दहीहंडी प्रेमी नागरिक उपस्थित होते.
दहीहंडीसाठी तीन पथकांना निमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये प्रारंभिक साताऱ्याचे भैरवनाथ गोविंदा पथक, कुरुंदवाडाचे दत्त अंब्रेश्वर, तासगावच्या शिवाजी गोविंदा पथकाने समांतर चढाई करत सलामी दिली. रात्री उशिरा यामध्ये शिवाजी पथकाने बाजी मारली. दरम्यान दहीहंडी सोहळ्यात आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाटिकेस नाट्यप्रेमींचा भरभरून प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी नगरसेवक गणेश माळी, पांडुरंग कोरे, बाबासाहेब आळतेकर, सलगरचे सुरेश कोळेकर, विजय पाटील, दिगंबर जाधव, उमेश पाटील उपस्थित होते. दहीहंडीचे संयोजन अमित कांबळे, सागर वडगावे, निरंजन आवटी, जयगोंड कोरे, अजिंक्य हंबर, उमेश हारगे, धनंजय कुलकर्णी, चैतन्य भोकरे, दादा धडस, मयूर नाईकवाडे, जितेंद्र खाडे यांच्यासह युवा कार्यकर्त्यांनी केले.