मिरजमधील जीर्ण इमारतीतील मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय तातडीने नूतनीकरण करा – ऋतुजा कांबळे

0
WhatsApp Image 2025-08-21 at 6.25.47 PM

मिरज (प्रतिनिधी)

मिरज महानगरपालिकेच्या आवारातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या, गळती लागलेल्या इमारतीमध्ये असलेले मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय हे सध्या धोकादायक इमारत बनलेली आहे. सतत पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने जीर्ण झालेले छत, भिंती, तलाठी कार्यालयाच्या छतावर पाणी साठून गळतीने महत्त्वाची कागदपत्रे, दस्ताऐवज, दप्तर, संगणक भिजले जात आहे. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कार्यालयामधील अधिकाऱ्यांच्या, नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका आहे. सदर तलाठी कार्यालयाच्या दुरावस्थेची दखल आपण प्रशासक नात्याने तातडीने घेऊन तलाठी कार्यालयाचे त्याच ठिकाणी नूतनीकरण करावे व नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी, अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रामदासजी आठवले) महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

वरील मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी, तहसीलदार आणि मिरजेच्या उपायुक्तांना देण्यात आले आहे. मंडल व तलाठी कार्यालयाचे लवकरात लवकर नूतनीकरण करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रामदासजी आठवले) पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा ऋतुजा कांबळे यांनी दिला आहे.

यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा सभापती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते अशोकरावजी कांबळे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अध्यक्षा पूजा जावळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मिरज शहर अध्यक्षा ऋतुजा कांबळे, वाहतूक आघाडीचे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष आनंदा हतेकर, अविनाश जकाते सर, भास्कर (बापू) जगताप, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, सागर दरबारे, सुरज कांबळे आधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *