मिरज रेल्वे स्थानकावर ‘सेवासदन’चा वैद्यकीय कक्ष ; आ. सुरेश खाडे यांच्याहस्ते उद्घाटन

0
1755771806747

मिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)

मिरज जंक्शन रेल्वे स्थानकावर आपत्कालीन वैद्यकीय कक्षाची सुविधा आता सेवासदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. उद्घाटन आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते व जनसुराज्यचे नेते समित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

भारतीय रेल्वे प्रशासनाचे अधिकारी डॉ. निलेश शिरगावकर, डॉ. नोशीन कापशीकर, डॉ. सिमरन रेल्वे अधिकारी पुणे डिव्हिजन व मिरज रेल्वे जंक्शनचे स्टेशन मास्तर जे. आर. तांदळे, ‘सेवासदन’ चे डॉ. रविकांत पाटील याप्रसंगी उपस्थित होते. या सेवेमुळे रेल्वे प्रवाशांना अपघात, आपत्कालीन परिस्थिती किंवा अचानक तब्येत बिघडल्यास तातडीची आणि आधुनिक वैद्यकीय मदत त्वरित मिळणार आहे. ही सुविधा सुरू झाल्याने मिरज जंक्शन येथील पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील प्रवाशांसाठी तसेच रेल्वेतील कर्मचाऱ्यांसाठी तातडीचे प्राथमिक उपचार उपलब्ध होतील.

यावेळी आ. डॉ.सुरेश खाडे म्हणाले, मिरज जंक्शनसारख्या गजबजलेल्या केंद्रावर अशा सुविधा उभारणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. हजारो प्रवाशांच्या जिवितासाठी ही सेवा अमूल्य ठरेल. अशा पायाभूत सुविधांमुळे समाजातील प्रत्येक घटकाला वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध होईल.

समित कदम म्हणाले, सेवासदन हेल्थकेअर ग्रुपने पुढाकार घेऊन ही सेवा सुरू केली आहे, हा निश्चितच स्तुत्य उपक्रम आहे. सार्वजनिक आरोग्यविषयक अशा सुविधा उभारणे म्हणजे समाजाबद्दल असलेली जबाबदारी अधोरेखित करणारे कार्य आहे.

डॉ. रविकांत पाटील म्हणाले, रेल्वे प्रवाशांना त्वरित व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय मदत मिळावी हे आमचे ध्येय आहे. या सेवेच्या माध्यमातून प्रवाशांच्या जीवितरक्षणासाठी प्रयत्न केले जातील. मिरजसारख्या महत्वाच्या रेल्वे जंक्शनवर ईएमआर (EMR) सुविधा सुरू झाल्याने दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना उत्कृष्ट दर्जाच्या आरोग्यसेवेचा थेट लाभ होणार आहे. याप्रसंगी सेवासदन हॉस्पिटलचे सर्व डायरेक्टर्स, डॉ. साक्षी पाटील, डॉ. दीपा पाटील, योगेश पाटील, डॉ. अमृता दात्ये, चिराग मार्टिन व हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *