मिरजेतील ज्ञान प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालयात दहीहंडी उत्साहात

मिरज (प्रतिनिधी)
येथील ज्ञान व प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज येथे दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे समन्वयक संतोष जाधव, ज्ञान प्रबोधनीच्या मुख्याध्यापिका सविता पाटील, प्री प्रायमरी इन्चार्ज स्वप्नाली मेंढे तसेच प्रज्ञा प्रबोधिनीच्या मुख्याध्यापिका कविता सातपुते आदींसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. चिमुकल्यांनी राधा कृष्णाचा पारंपारिक पोशाख परिधान करुन गोकुळाष्टमी आनंदाने साजरी केली.