मिरजेत शनिवारी जनसुराज्य शक्ती पक्षाची भव्य दहीहंडी : समित कदम

मिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाच्या आयोजन मिरजेतील मिरज शासकीय रुग्णालयाच्या समोर रुद्र पशुपती ग्राउंड येथे आयोजित करण्यात आले असून या दहीहंडीला सर्वांनी उपस्थित राहून याचा आनंद लुटावा असे आवाहन जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी केले आहे. या उत्सवासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेत्री उपस्थित राहणार आहेत.
समित कदम म्हणाले, शनिवारी (दि.२३) सायं.५ वा. या भव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज त्याची जय्यत तयारी सुरू होती. समित कदम यांनी आज या तयारीची पाहणी करून महिलांच्यासाठी बसण्याचे स्वतंत्र व्यवस्था त्यात सोबत येणाऱ्या मान्यवरांच्या बसण्याची भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारण्याची सूचना आयोजन समितीला दिल्या. महाराष्ट्रातले नावाजलेले गोविंदा पथक या दहीहंडी सोहळ्यांमध्ये उपस्थित राहणार असून हा दहीहंडीचा थरार मिरजकर नागरिकांना मिळावा यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे.
सिनेतारका अभिनेत्री अमायरा दस्तूर , सई मांजरेकर, निकिता दत्ता, नेहा पेंडसे, संस्कृती बालगुडे, अक्षया देवधर, जानवी किल्लेदार, प्रणाली सूर्यवंशी या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी विविध मनोरंजनांचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन समित कदम यांनी केले आहे.
यावेळी अमित कदम, आनंद सागर पुजारी, नाना घोरपडे, योगेश दरवंदर, सुनील बंडगर, अरविंद पाटील, प्रदीप सातपुते, संदीप पाटील, शंकर कदम, सुशांत काळे, अजित कट्टीकर, विशाल पडवळकर, मशीन जमादार, पापा मुजावर, समीर मालगावे, नितीन गावडे, सुधीर कवाळे हे आज या उत्सवाची तयारी करीत होते.