राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची गळती सुरूच ; प्रशांत शेजाळांचा शेकडो कार्यकर्त्यांसह ‘जनसुराज्य’मध्ये प्रवेश

मिरज (प्रतिनिधी)
तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची गळती सुरूच असून नाराज झालेले पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात जनसूराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत. जनसूराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यामध्ये आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष बांधणी जोमात सुरू आहे.
आज जनसुराज शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करोली टी येथील मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रशांत शेजाळ, सरपंच हेमंत पाटील, उपसरपंच किशन चंदनशिवे, शशिकांत जगताप, तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार शेटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.
यावेळी महादेव कुरणे, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. पंकज म्हेत्रे, मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर, कुपवाडची अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष कासम मुल्ला, प्रदीप सातपुते, आदित्य साळुंखे, अनुराज देवकाते, विनायक शेरबदे, आर्यन सोनवणे, मानतेस कुरणे उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संधी देऊन महायुतीची ताकद देणार असे आश्वासन समित कदम यांनी यावेळी दिले.