सांगलीत आ. सुधीर गाडगीळांकडून सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा

सांगली (प्रतिनिधी- विनायक क्षीरसागर)
सांगली विधानसभा क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘स्वदेशी’ या विषयांवर आकर्षक देखावे सादर करणाऱ्या मंडळांना रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.
प्रथम क्रमांक १५ हजार, द्वितीय क्रमांक १० हजार, तृतीय क्रमांक ५ हजार अशी आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय जी मंडळे या स्पर्धेत भाग घेतील त्या सर्व मंडळाना एक आकर्षक भेटवस्तू देण्यात येईल. सर्व इच्छुक स्पर्धक गणेशोत्सव मंडळांनी दि. २९ ऑगस्ट पर्यंत सहभाग नोंदवावा. त्यासाठीचे प्रवेश अर्ज आमदार सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालय विश्रामबाग येथे उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी मुकुंद पटवर्धन : 94230 03951,
विश्वजीत पाटील : 98231 77744, अतुल माने : 98236 06151, केदार खाडीलकर : 98226 12160 यांचेशी संपर्क साधावा.