मंत्री अबिटकर यांची मोहन वनखंडे यांच्या निवासस्थानी भेट

मिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी शिवसेना नेते प्रा. मोहन वनखंडे सर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक गौरव नाईकवडी, जिल्हा उपाध्यक्ष माधव गाडगीळ, शिवसेना युवा नेते सागर वनखंडे, मोहन शिंदे, मतीन काझी, शंकर शिंदे, श्रीकांत एडके, अमोल थोरवे, अशोक शिंदे, अमित शिंदे,नितेश सहस्त्रबुद्धे, हर्षद जोशी, कपिल भंडारे, सुरज जमने, श्रीधर मोरे, श्रीधर तवटे आदी मान्यवर उपस्थित होते. या सदिच्छा भेटीदरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन, विकासकामे, स्थानिक समस्या, आरोग्यविषयक मुद्दे तसेच संघटनात्मक घडामोडींवर मार्गदर्शन व विचारमंथन करण्यात आले.