केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

0
Photo

मिरज (प्रतिनिधी)

येथील केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या प्रदर्शनात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध शास्त्रीय प्रयोग, मॉडेल्स आणि प्रकल्प सादर केले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाने दिलेल्या दहा-गाभाभूत घटकापैकी एक वैज्ञानिक दृष्टिकोन हा घटक साध्य करण्यात आलेला आहे.

डायनाकॉटस् प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संदीप सोले प्रदर्शनास प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. संदीप सोले यांनी भारताच्या संरक्षण आणि अवकाश प्रकल्पात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. या प्रदर्शनासाठी शाळेचे चेअरमन पृथ्वीराज पाटील, विश्वस्त वीरेंद्र पाटील, समन्वयक सतीश पाटील आणि मार्गदर्शक प्रदीप पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या प्रदर्शनामध्ये इयत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विषय वाटून दिले होते त्यानुसार त्यांनी सगळे प्रकल्प आणि मॉडेल सादर केले. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी गटागटाने मॉडेल्स तयार करून प्रेक्षकांसमोर त्याचे सविस्तर स्पष्टीकरण दिले. पालक, शिक्षक तसेच स्थानिक मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. मुख्याध्यापिका क्रिस्टीना मार्टिन यांनी शाळेचे प्रशासक रफिक तांबोळी, उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर आणि समन्वयक अश्विनी येळकर त्याचप्रमाणे शिक्षकांनीही दिलेल्या योगदानाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *