मिरजेतील महेश चिन्निंटी यांना ‘आरोग्य दूत’ पुरस्कार

मिरज (प्रतिनिधी)
अथक परिश्रमाची व सामाजिक कार्याची दखल घेऊन महेश चिन्निंटी यांना नुकताच ‘आरोग्य दूत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितींवर मात करत आत्मविश्वासाने व सेवाभावाने कार्य करताना त्यांनी गरजू रुग्णांना जीवनदान मिळवून देण्याचे मोलाचे कार्य केले आहे.
त्यांनी सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आपत्कालीन काळात योग्य ती रुग्णसेवा उपलब्ध करून अनेक रुग्णांना नवसंजीवनी दिली. गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या रुग्णांच्या जीवनात आशेचा किरण ठरलेले त्यांचे हे योगदान प्रेरणादायी आहे. मूळत: हा पुरस्कार पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते देण्यात येणार होता, मात्र अपरिहार्य कारणास्तव महेश चिन्निंटी अनुपस्थित राहिल्याने भाजपा वैद्यकीय आघाडीचे चेअरमन डॉ. रवींद्र आरळी यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.