मिरजेतील साळुंखे महाविद्यालयाचे युवा महोत्सवात यश ; ९ स्पर्धा प्रकारात बाजी

मिरज (प्रतिनिधी)
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठाच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, उरुण इस्लामपूर येथे झालेल्या ४५ व्या सांगली जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यश संपादन केले. महाविद्यालयाने १३ स्पर्धा प्रकारांमध्ये सहभाग घेतला. त्यापैकी नऊ स्पर्धा प्रकारांमध्ये यश संपादन केले. सहभागी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
वैयक्तिक स्पर्धा प्रकारामध्ये इंग्रजी वक्तृत्वमध्ये तरन्नुम शेख प्रथम, सुगम गायनमध्ये सिद्धांत गोंधळी प्रथम, हिंदी वक्तृत्वमध्ये समिया बारगीर हिने द्वितीय, एकपात्री अभिनयात रूता डांगे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. वैयक्तिक स्पर्धा सर्वसाधारण विजेतेपदाचा फिरता चषक महाविद्यालयाने मिळवला आहे. सांघिक प्रकारात महाविद्यालयाने मूकनाट्य तृतीय, पथनाट्य तृतीय, लघुनाटिका तृतीय, एकांकिका चतुर्थ, लोकनृत्य पाचवा क्रमांक मिळविला.
सांघिक स्पर्धा प्रकारांमध्ये महाविद्यालयातील तरन्नुम शेख, सिद्धांत गोंधळी, जहीर शरीकमसलत, व्यंकटेश माने, धारणा आवटे, सायली पिसे, रेहान मुजावर, संस्कार जाधव, कशिश मुजावर, अभिनंदन बावरे, तबस्सुम सनदी, अश्विनी गजापगोळ, स्रेहल शिंदे, श्रद्धा खांडेकर, पूजा गोसावी, शिवाजी पाथरूट, सानिका मोरे, दिव्या कोळी, अनिशा इंगोले, प्रथम चव्हाण, आलिया मोमीन, अथर्व धुमाळ, सिद्धांत कांबळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या यशात डॉ.अर्जुन जाधव, प्रा. सुहास वाघमोडे, डॉ. राजेंद्र लवटे, डॉ. स्वाती हाके, डॉ. शिल्पा खैरमोडे यांचे योगदान आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रा. अरुणा सकटे, प्रा. संजय कांबळे, राहुल कदम, चिंदू अस्वले, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.