केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे व्हॉलीबॉल स्पर्धेत उल्लेखनीय यश

मिरज (प्रतिनिधी)
झील इंटरनॅशनल स्कूल, कुपवाड येथे कृष्णा सहोदय कॉम्प्लेक्स तर्फे आयोजित १५ वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, मिरज (सीबीएससी) ने उज्वल कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले. या स्पर्धेत शाळेच्या मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक, तर मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावून शाळेचे नाव उज्वल केले. सतत पडणाऱ्या पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीत देखील दोन्ही संघांनी जिद्द, चिकाटी आणि संघभावना यांचा उत्कृष्ट प्रत्यय दिला.
या उल्लेखनीय यशाच्या पार्श्वभूमीवर १५ सप्टेंबर २०२५ रोजी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचा विशेष गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी कॅम्पस समन्वयक सतीश पाटील, मुख्याध्यापिका ख्रिस्तीना मार्टिन मॅडम, प्रशासक रफिक तांबोळी , उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर आणि शाळा समन्वयक अश्विनी येळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या यशामागे शाळेच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातील शिक्षक अमोल जाधव, चंद्रशेखर मिरजे, राजेश कुरणे व दीक्षा पोळ यांचे परिश्रम, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वाचे ठरले. शाळेचे चेअरमन पृथ्वीराज पाटील आणि विश्वस्त वीरेंद्रसिंह पाटील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.