पाडळी खुर्द येथे अजगर पकडले

0
अजगर

पाडळी खुर्द येथे रवींद्र माने यांच्या घरा मागे असलेल्या आंब्याच्या झाडावर सर्पमित्राने पकडलेले अजगर

कोपार्डे ता.16 (प्रतिनिधी)  पाडळी खुर्द (ता. करवीर) येथे अजगराला पकडण्यात सर्पमित्राला यश आले आहे.हा अजगर रवींद्र माने यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडावर होता.
     समजलेली माहिती अशी रविवारी सायंकाळी आठच्या दरम्यान रविंद्र माने हे घराच्या पाठीमागे गेले होते. वीजेच्या बल्ब लावल्या नंतर आंब्याच्या झाडाच्या फादीला विळखा घातलेला अजगर या बल्बच्या प्रकाशात चकचकत दिसत होता. त्यांनी निरखून पाहिले असता प्रथम त्यांना तो साप असल्याचे जाणवले. बालिंगा येथील सर्पमित्राला बोलवून त्याला पकडले असता तो अजगर असल्याचे स्पष्ट झाले साधारणपणे पाच ते सहा फुट हा अजगर चपळ होता. त्याला वन्य अधिवासात सोडण्यात आले.शक्यतो अजगर नागरी वस्ती शेजारी दिसत नाही. पण मुसळधार पावसामुळे डोंगरातून अथवा जंगलातील हा अजगर आलेल्या पुराच्या पाण्याबरोबर वाहत आला असावा असा अंदाज सर्पमित्रानी वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *