देशिंग येथे १४० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान

सांगली प्रतिनिधी
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने सोमवार (दि.१५) सप्टेंबर रोजी संत निरंकारी सत्संग भवन देशिंग या ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून १४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचा शुभारंभ नंदकुमार झांबरे, झोनल प्रमुख सातारा ( झोन ३४A ) यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलनाद्वारे करण्यात आला.
याप्रसंगी सांगलीचे सेक्टर संयोजक जालिंदर जाधव, सातारा क्षेत्राचे संचालक किशोर माने, जगन्नाथ निकाळजे, रक्त संकलन अधिकारी डॉ.यशवंत शेंडे आदी उपस्थित होते. सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांचा सत्य प्रेम व एकत्वाचा संदेश जगामध्ये मानवता आणि विश्वबंधुत्व स्थापन करणारा आहे. देशिंग येथे संपन्न झालेल्या शिबिरात मिरज येथील मिरज सिव्हिल ब्लड बँक सांगली सिव्हिल ब्लड बँक व शिरगावकर ब्लड बँक सांगली यांनी रक्त संकलित केले.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी स्थानिक सेवादल युनिट द्वारे उत्तम असे नियोजन केले होते. शिबिरासाठी सरपंच प्रवीण पवार,पै.आण्णा कोळेकर, सेवा निवृत्त कॅप्टन महालिंग स्वामी इ. उपस्थित होते. या शिबिराला स्थानिक आमदार रोहित पाटील यांनी भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. अनेक मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन, रक्तदान करून शुभेच्छा दिल्या. आलेल्या सर्व अतिथींचे ब्रॅच मुखी अलका सुतार यांनी आभार मानले.