अथर्वशीर्ष पठणाने भारावले गणपती मंदिरातील वातावरण

अडीचशे महिलांचा सहभाग ; पृथ्वीराज पाटील यांचे आयोजन
सांगली (प्रतिनिधी)
ॐ नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि… श्री संस्थान गणपती मंदिरातील वातावरण आज अथर्वशीर्ष पठणाने भारावून गेले. येथे दर्शन मंडपात अडीचशे महिलांनी अथर्वशीर्षाची आवर्तने गणरायाच्या चरणी समर्पित केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी विशेष धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले होते. माजी नगरसेविका भारती दिगडे यांच्या सहकार्याने आणि पंचायतन संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा संपन्न झाला. पृथ्वीराज पाटील, सौ. विजया पाटील, सौ. प्रियांका पाटील यांच्यासह कुटुंबियांनी त्यात सहभाग घेतला. लाल साडी परिधान केलेल्या महिलांनी अत्यंत उत्साहाने पठण केले.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या अध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन केले. त्यांनी जगाला देशाच्या शक्तीचा परिचय करून दिला. त्यांच्यावर आज आम्ही भक्तीमार्गाने शुभेच्छांचा वर्षाव केला. ही गणरायाची नगरी आहे. या ठिकाणच्या सोहळ्यातून श्री. मोदी यांच्या दीर्घआयुष्याची आणि त्यांच्या नेतृत्वात भारताच्या, महाराष्ट्राच्या गतीमान प्रगती करत राहो, अशी प्रार्थना केली.’’
भाजप मंडल अध्यक्ष रवी वाधवणे, प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा स्वाती शिंदे, प्रकाश बिरजे, सौ . अभ्यंकर, माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, बाळासाहेब काकडे, बाळासाहेब बेलवलकर, गीतांजली ढोपे पाटील, शीतल सदलगे, मयुरेश पेडणेकर, मुकुंद पेडणेकर, प्रकाश बिरजे, श्रीकांत शिंदे, सुशांत गवळी, शुभम बनसोडे, प्रशांत देशमुख, रघुनाथ नार्वेकर, प्रशांत अहिवळे, किरण कपाले, मोहन जामदार, बंडू पोद्दार, भाऊजी बेलवलकर आदी उपस्थित होते. विजय कडणे यांनी निवेदन केले.