नांगोळे-कवठेमहांकाळ रोडवर गुटखा जप्त ; कवठेमहांकाळ पोलिसांकडून २३ लाखाचा मुद्देमाल जप्त

सांगली (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
नांगोळे ते कवठेमहांकाळ रोडवर अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह तब्बल २३ लाख ३९ हजार रु. किमतीचा विमल व रजनीगंधा पान मसाला असा मुद्देमाल कवठेमहांकाळ पोलिसांनी जप्त केला. सदरची कारवाई सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. प्रशांत राजेंद्र गोडसे (वय २८, रा. वडूज, ता. खटाव, जि. सातारा) असे टेम्पो चालकाचे नाव असून त्यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या आदेशानुसार जत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले व पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस हेडकॉन्स्टेबल आप्पासो हाक्के व पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर ऐवळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमी प्रमाणे कवठेमंकाळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये नांगोळे येथे एक इसम टेम्पो क्रमांक एम एच १० सीआर ७५४५ मध्ये बंदी घातलेला गुटखा घेऊन जाणार असल्याची बातमी मिळावी.
त्यानुसार तपासणीदरम्यान टेम्पोमध्ये पोत्यांमध्ये भरलेला विमल व रजनीगंधा पान मसाला पोलिसांना आढळून आला. सदर टेम्पोसह एकूण मालाची किंमत २३ लाख ३९ हजार रु. इतकी आहे. प्रशांत राजेंद्र गोडसे (वय २८ रा. वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा असे टेम्पो चालकाचे नाव असून टेम्पो व गुटखा यासह कवठेमहंकाळ पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.