कन्या महाविद्यालयात दांडिया-हादग्याच्या तालावर उमटला भक्तिभाव आणि नृत्याविष्काराचा अभिनव सोहळा

मिरज (प्रतिनिधी)
मिरज मधील कन्या महाविद्यालयात नवरात्रीनिमित्त दांडिया, गरबा नृत्य आणि हादगा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव राजू झाडबुके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सुनिता माळी,पर्यवेक्षिका प्रा.सौ. नलिनी प्रज्ञासूर्य उपस्थित होत्या.
महाविद्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत दांडियाच्या आणि गरबाच्या तालावर उत्स्फूर्त नृत्य केले. तसेच, हादगा पूजन विशेष विधीने पार पडले, ज्यामध्ये हत्तीची पूजा करण्यात आली आणि पारंपरिक हादगा गाणी गायली गेली. रंगीबेरंगी वेशभूषा, तालबद्ध नृत्य, हादगाच्या गाण्यांचा गजर आणि भक्तिभावपूर्ण वातावरणाने संपूर्ण महाविद्यालय उत्सवाच्या रंगात रंगलेले होते.
कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन सांस्कृतिक विभागाचे प्रा. विनायक वनमोरे, प्रा. प्रशांत लिंबीकाई,डॉ.गंगाधर चव्हाण, डॉ. मधुरा जाधव, डॉ. रूपाली वाघमारे प्रा. दिपाली आगरे, प्रा. प्रमिला जाधव, प्रा. भाग्यश्री कुंभारकर यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.