मिरजेत उद्योजक विनायकदादा यादव युथ फाऊंडेशनच्या खेळ पैठणीचा कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मिरज (प्रतिनिधी)
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्योजक विनायकदादा यादव युथ फाउंडेशन, मिरज यांच्या वतीने भव्य “खेळ पैठणी” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सिनेअभिनेते व लोकप्रिय सेलिब्रिटी अँकर नितीन गवळी यांच्या सूत्रसंचालनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. मिरजसह आसपासच्या परिसरातील शेकडो महिलांनी या खेळात उत्स्फूर्त सहभाग घेत खेळाचा मनसोक्त आनंद लुटला.
उद्योजक विनायकदादा यादव यांच्या विनायकदादा युथ फाऊंडेशन तर्फे हा खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खेळ पैठणीचा या कार्यक्रमातील विजेत्यांना ५० पैठणी, ५० एलईडी टीव्ही, सोन्याची नथ, फ्रीज, आटाचक्की शेगडी, श्री स्वामी समर्थ यांच्या २०० चांदीच्या मुर्तीचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुमनताई खाडे, स्नुशा सौ. स्वातीताई खाडे, सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई नलवडे यांच्यासह माजी नगरसेवक, सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
शेकडोंच्या संख्येने महिलांनी खेळात सहभागी घेऊन याचा आनंद लुटला. उद्योजक विनायकदादा यादव यांनी हा कार्यक्रम आयोजित करून स्त्री शक्तीचा सन्मान केल्याबद्दल माता भगिनींनी त्यांचे कौतुक केले.