शिवाजी विद्यापीठ जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेत रयतच्या शाहू कॉलेजचे यश

0
शिवाजी विद्यापीठ जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेत रयतच्या शाहू कॉलेजचे यश

स्पर्धा जयवंत महाविद्यालय इचलकरंजी येथे संपन्न झाली

कोल्हापूर. (प्रतिनिधी) महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये संशोधनात्मक दृष्टिकोन वाढलीस लावण्यासाठी शिवाजी विद्यापीठ दरवर्षी कला भाषा आणि साहित्य ललित कला, वाणिज्य व्यवस्थापन आणि कायदा, शुद्ध विज्ञान, कृषी आणि पशुधन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान व वैद्यकीय आणि औषधनिर्माण अशा सहा विषयामध्ये अविष्कार स्पर्धा घेत असते.

      ही स्पर्धा जयवंत महाविद्यालय इचलकरंजी येथे संपन्न झाली ह्या स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजची वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थिनी कु. रोजनिन मुनीर जमादार हिने शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आयोजित कोल्हापूर जिल्हा आविष्कार स्पर्धेमध्ये कृषी आणि पशुधन या विषयामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

    तिला वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. शकील शेख, डॉ. ए. एस. शेख, प्रा. ए.ए. पेंढारी यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या ह्या यशाबद्दल मा. सरोज पाटील (माई) महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन तथा जनरल बॉडी सदस्या सौ. संगीता प्रशांत पाटील, जनरल बॉडी सदस्य मा. प्रशांत पाटील, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, यांनी तिचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *