कमला कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

0
13.10.25

कमला कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

कोल्हापूर.(प्रतिनिधी)

    वाचन प्रेरणा दिनानिमित्त कमला कॉलेज मध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके, विविध मोटिवेशनल ग्रंथ, विश्वास पाटील यांचे मन मे हे विश्वास, स्टीव्ह जॉब्स यांचे चरित्र, अच्युत गोडबोले यांचे मनात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गौर गोपालदास यांचे संकलित व्याख्यानमाला, विविध राजकीय सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामधील व्यक्तींची चरित्र, डिक्शनरीज, इनसायक्लोपीडिया विद्यार्थिनींना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या.

       ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी कमला कॉलेजच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये विविध पुस्तके, ग्रंथ, नियतकालिके, डिक्शनरीज असून त्याचा तुम्ही विद्यार्थिनींनी जरूर वापर केला पाहिजे व तुमच्या सर्वांगीण विकासामध्ये ग्रंथालयांचे योगदान हे अनन्यसाधारण असते.

   ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन ग्रंथपाल श्रीमती उर्मिला कदम, ग्रंथालय समिती सदस्य व ग्रंथालय सेवक वर्ग यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सीनियर ज्युनिअर व पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थिनींनी ग्रंथ प्रदर्शनास आवर्जून भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *