जलतरण स्पर्धेत रयतच्या शाहू कॉलेजचे धवल यश
मा. सरोज पाटील (माई) महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन तथा जनरल बॉडी सदस्या यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
कोल्हापूर. (प्रतिनिधी)
शिवाजी विद्यापीठ विभागीय जलतरण स्पर्धा रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर येथील राष्ट्रीय जलतरणपटू सागर प्रशांत पाटील जलतरण तलाव ह्या ठिकाणी शनिवार दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी स्पर्धा पार पडल्या. महिला व पुरुष ह्या दोन्ही गटात संपन्न झालेल्या ह्या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा मराठी विभागप्रमुख डॉ. ए. पी.उबाळे यांच्या शुभहस्ते झाले.याप्रसंगी कोल्हापूर विभागीय क्रीडा परिषदेचे सेक्रेटरी डॉ. निलेश पाटील उपस्थित होते.
या स्पर्धेत महाविद्यालयाच्या तेजस किरण माने ह्या विद्यार्थ्यांने १०० व २०० मीटर बटरफ्लाय ह्या दोन्हीमध्ये प्रथम क्रमांक, ओंकार सत्यवान पाटील ४०० मीटर फ्री स्टाइल द्वितीय क्रमांक, ८०० मीटर फ्रीस्टाइल प्रथम क्रमांक व १५०० मीटर फ्रीस्टाइल प्रथम क्रमांक, ऋषिकेश कमलाकर पाटील यांनी ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रथम क्रमांक,१०० मीटर बॅकस्ट्रोक द्वितीय क्रमांक, ५० मीटर बॅकस्ट्रोक द्वितीय क्रमांक, १०० मीटर बॅकस्ट्रोक द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तेजस किरण माने, ऋषिकेश कमलाकर पाटील, ओंकार सत्यवान पाटील, रोहन नारायण गुरव, रामदास बाळासो आडुळकर यांनी ४ x १०० फ्रीस्टाईल रिले , ४ x २०० मीटर फ्रीस्टाईल रिले, ४ x १०० मीटर मेडले रिले प्रकारात अनुक्रमे तृतीय क्रमांक, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक प्राप्त केले. महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठ विभागीय जलतरण स्पर्धेत सर्वसाधारण सांघिक उपविजेतेपदासह चॅम्पियनशिप प्राप्त केली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ के. आय. टी. कॉलेजचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा . विजय रोकडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
विद्यार्थ्यांच्या ह्या यशाबद्दल मा. सरोज पाटील (माई) महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन तथा जनरल बॉडी सदस्या सौ. संगीता प्रशांत पाटील, जनरल बॉडी सदस्य मा. प्रशांत पाटील, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, यांनी त्यांचे अभिनंदन केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. गणेश लवंगारे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विक्रमसिंह नांगरे, प्रा. सविता माजगावकर, प्रा. समाधान बनसोडे, स्विमिंग कोच मानसिंग पाटील, अंकुश पाटील, संतोष डोकरे, अमर पाटील व सर्व जलतरण तलाव स्टाफने स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.


