सायली माने हिची राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड

0
सायली महावीर

कोल्हापूर.(प्रतिनिधी)     जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचे वतीने आयोजित शिवाजी विद्यापीठ क्रीडा विभाग कोल्हापूर येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय 19 वर्ष मुली तलवारबाजी स्पर्धेमध्ये कमला कॉलेजच्या कनिष्ठ विभागातील इयत्ता बारावी सायन्स मधील खेळाडू कु. सायली सचिन माने या खेळाडूने प्रथम क्रमांक मिळविला.

      तलवारबाजी मधील सेबर या प्रकारात कु. सायली माने हिने विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी कु. सायली माने या खेळाडूची निवड झाली आहे. 

      कु. सायली माने या खेळाडूस ताराराणी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, सचिव प्राजक्त पाटील, प्राचार्या तेजस्विनी मुडेकर, उपप्राचार्य मोहन जाधव, लेफ्टनंट ज्योती लेंगरे, पूजा ठाकूर, आणि क्रीडाशिक्षक रघू पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *