मनपा जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेमध्ये कमला कॉलेज विजयी

0
मनपा कोल्हापूर

 कोल्हापूर.(प्रतिनिधी)   जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचे वतीने आयोजित एल.आय.सी. ग्राउंड कोल्हापूर येथे झालेल्या मनपा जिल्हास्तरीय 19 वर्ष मुली नेटबॉल स्पर्धेमध्ये कमला कॉलेजच्या कनिष्ठ विभागातील नेटबॉल संघाने विजेतेपद पटकावले.

        या स्पर्धेमध्ये अंतिम सामना न्यू मॉडेल ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर यांच्या संघासोबत झाला. अंतिम सामन्यांमध्ये कमला कॉलेजची खेळाडू कु.वैभवी येडूरकर ने चार गोल आणि कु.दक्षता कामिरे ने दोन गोल असे एकूण सहा गोल केले तर विरुद्ध संघ न्यू मॉडेल चे दोन गोल झाले. एकूण चार गुणांच्या फरकांनी कमला कॉलेजने विजेतेपद पटकावले.

      कमला कॉलेजच्या नेटबॉल संघामध्ये कर्णधार संचिता सावंत, वैभवी येडूरकर, रिद्धी शिंदे,चैतन्या पेडणेकर, प्रणाली ढाले, स्मिता वासुदेव, दिपाली कांबळे, दक्षता कामिरे, वैष्णवी जाधव, भक्ती सुगतेकर, नम्रता उंटवाले, दिपालीकुमारी प्रसाद या खेळाडूंचा समावेश होता. मायणी सातारा येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी कमला कॉलेजच्या नेटबॉल संघाची निवड झाली आहे.

     या खेळाडूस ताराराणी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, सचिव प्राजक्त पाटील, प्राचार्या तेजस्विनी मुडेकर, उपप्राचार्य मोहन जाधव, लेफ्टनंट ज्योती लेंगरे, पूजा ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *