डॉ. एच. आर. निरंकारी यांच्या पुढाकाराने वाहनचालक व परिचर यांना दिवाळी भेट
शाहूवाडी तालुका आरोग्य अधिकारी यांचा अभिनव उपक्रम
सरूड. (प्रतिनिधी) पंचायत समिती शाहूवाडी येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी यांच्या स्वखर्चातून आरोग्य विभागातील वाहनचालक व परिचर यांना दिवाळी भेट वस्तू देण्यात आली. दिवाळीच्या शुभप्रसंगी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला आहे.
या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहायिका तसेच पंचायत समिती शाहूवाडी आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. आपुलकीच्या वातावरणात भेटवस्तू देण्यात आल्या व सर्व कर्मचाऱ्यांनी डॉ. निरंकारी यांचे मनःपूर्वक आभार मानले.
वाहनचालक व परिचरांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले की, “आरोग्य विभागात काम करताना आमच्या योगदानाची दखल घेतली गेली हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.”
हा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांसाठी प्रेरणादायी ठरावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रत्येक तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील वाहनचालक व परिचारकांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करावे, अशी सर्वांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या अभिनव उपक्रमामुळे तालुका आरोग्य कार्यालय शाहूवाडीचे वातावरण उत्साहाने उजळून निघाले होते.


