ट्रॅव्हल एजंटना भेडसावणारे प्रश्न सोडविण्यास ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे ऑफ इंडिया चे प्रथम प्राधान्य राहील-अध्यक्ष मेहबूबभाई शेख

0
ट्रॅव्हल एजंट असोसिएशन सर्वसाधारण सभा

कोल्हापूर.(प्रतिनिधी) : ट्रॅव्हल एजंटला भेडसावणारे प्रश्न व समस्यांच्या प्राधान्याने सोडविण्यास ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे प्रथम प्राधान्य राहील, अशी ग्वाही ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे ऑफ इंडिया मध्य व साउथ महाराष्ट्राचे अध्यक्ष मेहबूबभाई शेख यांनी दिली.
ट्रॅव्हल एजंट असोसिएशनची सर्वसाधारण सभा नुकतीच कोल्हापूरात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या सभेस ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया चे मध्य महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र यांचे सेक्रेटरी श्रीयुत याजडी मार्कर, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया सेंट्रल कमिटीचे मेंबर श्री बहराम झाडये कोल्हापूरचे अध्यक्ष बळीराम वराडे उपस्थित होते.
मेहबूबभाई शेख बोलतांना पुढे म्हणाले की, ट्रॅव्हल एजंटना एअरलाइन्स, हॉटेल इंडस्ट्री ,विजा, व्हीएफएस ,ट्रॅव्हल इन्शुरन्स व इतर सर्विसेस बद्दल येणाऱ्या अडचणी हा ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया ही बॉडी गव्हर्मेंट ऑफ इंडिया मार्फत सातत्यांने पाठपुरावा करुन प्रश्न मार्गी लावले जातील. ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाचे मध्य महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र यांचे सेक्रेटरी श्रीयुत याजडी मार्कर यांनी जीएसटी व टीसीएस बद्दलची माहिती दिली. ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया सेंट्रल कमिटीचे मेंबर बहराम झाडये हे सेंट्रल बॉडीवर असल्यामुळे त्यांनी सर्व ट्रॅव्हल एजंट चे प्रॉब्लेम्स हे मध्यवर्ती कार्यालयामार्फत सोडवता येईल असे सांगितले.
ट्रॅव्हल एजंट असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष बळीराम वराडे यांनी ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाचे सर्वांनी फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करावे व जास्तीत जास्त मेंबर होण्यासाठी विनंती केली यावेळी ट्रॅव्हल इन्शुरन्स कंपनी च्या एरिया मॅनेजर श्री सावंत, अकाशा एअरलाईनचे मॅनेजर श्री धुमाळ यांनी आपल्या एअरलाइन बद्दलचे जाळे भारतामध्ये कसे आहे भारताच्या बाहेर कसे आहेत त्यांचं भाडे किती आहे आणि ते पॅसेंजर साठी किती कम्फर्टेबल आहेत याच्याबद्दलची उपयुक्त माहिती आमच्या सर्व ट्रॅव्हल एजंट्स ना देण्यात आली
याप्रसंगी ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे उपाध्यक्ष विनोद कंबोज, सेक्रेटरी रवी पोद्दार ,ट्रेझरर संजय गांधी, संचालक इमरान भाई मुल्ला, विवेक महाजन, मनीष कट्टी,नंदिनी ट्रॅव्हलचे सुनील सन्नाके, सकील मोमीन, नाटेकर , प्रकाश विचारे, सचिन फडणिस, मल्हार जाधव तसेच असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *