सांगली जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज करा:- देवराज पाटील

0
WhatsApp Image 2025-11-05 at 6.39.17 PM

सांगली जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज करा:- देवराज पाटील

सांगली (प्रतिनिधी) आपल्या जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सुद्धा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. त्यानुषंगाने विविध पदासाठी निवडणुकाकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी अधिकृत उमेदवारीसाठी पक्षाकडे इच्छुक उमेदवारी अर्जा नुसार मागणी करावी. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्या तालुकाध्यक्षांकडे विहित नमुन्यामध्ये अर्ज करून ते दि. ९ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाकडे पोहच करावेत. इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्रदेश कार्यालयाकडे पाठवून त्यासंदर्भात उमेदवारी निश्चित करणेची प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी पक्षाच्या बैठकीत केले.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिलाध्यक्षा सुस्मिता जाधव, युवक जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, प्रदेश सदस्य वैभव शिंदे, पै. ताजुद्दीन तांबोळी, हायुम सावनूरकर, जिल्हा ओबीसी अध्यक्ष जालिंदर कटरे, सामाजिक न्याय विभागाचे कुमार लोंढे, राजू पाटील यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *