सरूड जिल्हा परिषद साठी युवा चेहरा

0
अमर पा

सरूड जिल्हा परिषद सत्यजीत पाटील सरूडकर यांचा बाले किल्ला

सरूड, ता.14 (प्रतिनिधी) सत्यजीत पाटील सरूडकर यांचा बाले किल्ला असणाऱ्या सरूड जिल्हा परिषद मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी सामाजिक कार्यासह राजकीय वारसा असणाऱ्या सर्वसामान्य मध्ये मिसळणारा युवा कार्यकर्ता अमरसिंह पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाकडून सरूड जिल्हा परिषदेसाठी नाव आघाडीवर असल्याने सरूड जिल्हा परिषद मतदार संघाला युवा चेहरा मिळणार

      सरूड जिल्हा परिषद नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे तर या जिल्हा परिषद मतदार संघावर शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील यांचे कायम वर्चस्व राहिले आहे. गेल्या वीस वर्षापासून या मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य असणारे माजी जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील यांनी या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांचा वारसा पुढे चालवत भेडसगाव ग्रामपंचायत चे माजी सरपंच पदाची धुरा उत्तमरीत्या सांभाळणारे व सर्व सामान्य मध्ये मिसळून सर्वांचे प्रश्न सोडवणारे सामाजिक वारसा पुढे चालवण्यासाठी जिल्हा परिषदेसाठी महाविकास आघाडी कडून अमर पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. अमरसिंह पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याने यावेळी या मतदारसंघाला युवा नेतृत्व लाभणार आहे.

       मतदारसंघ निर्मितीपासून या मतदारसंघावर सरूडकर गटाचे वर्चस्व आहे. माजी आमदार सत्यजीत पाटील व त्यांचे वडील बाबासाहेब पाटील यांनी आपआपल्या राजकारणाची विजयी सुरवात ही याच मतदार संघातून केली आहे. सुरवातीपासून हा मतदार संघ हा सरूडकर गटाचा हक्काचा राहीला आहे. याला विरोधी गटाकडून नेहमीच खिंडार पाडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण त्या प्रयत्नाला यश एकदासुध्दा आले नाही. यावरूण या मतदारसंघावरील सरूडकर गटाची मजबूत पकड दिसून येते.

   सरूड जिल्हापरीषद मतदारसंघातून हंबीरराव पाटील यांनीही प्रतिनिधीत्व केले आहे. आता त्यांचा चिंरजीव अमरसिंह पाटील यांनी तयारी केली आहे. त्यांच्या रूपाने या मतदारसंघाला एक युवा नेतृत्व मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *