बाबासाहेब आळतेकर यांची भाजप शहर जिल्हा सरचिटणीसपदी निवड

0
babasaheb

मिरज (प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टीची सांगली शहर जिल्ह्याची कार्यकारणी खरे सांस्कृतिक हॉल येथे जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीत मिरजेचे भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष, माजी जिल्हा चिटणीस बाबासाहेब आळतेकर यांची जिल्हा सरचिटणीस पदी नेमणूक करण्यात आली. आळतेकर यांनी पक्षाचे प्रामाणिकपणे काम केल्याने त्यांना ही पक्ष श्रेष्ठींकडून जिल्हा स्तरावर महत्त्वाचे पदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.

निवडीनंतर बाबासाहेब आळतेकर म्हणाले की, आपण यापूर्वी भाजप पक्ष वाढविण्यासाठी शहरातून चांगले काम केले आहे येणाऱ्या काळात याही पेक्षा अधिक काम करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे असेही ते म्हणाले. तसेच त्यांना ही संधी दिल्याने त्यांनी आमदार सुरेश भाऊ खाडे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, भाजपा पाश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे, जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांचे आभार मानले.

बाबासाहेब आळतेकर यांनी महाआघाडीच्या काळात अनेक आंदोलने केली आहेत. महापूर असो किंवा कोरोना काळात समाजामधे ते नेहमी मदतीला अग्रेसर होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी चांगले काम केले आहे. यावेळी राज्याचे माजी कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, आमदार सुधीर दादा गाडगीळ, भाजपा पाश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, राज्य विद्युत मंडळाच्या संचालिका नीताताई केळकर, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज भैय्या पवार, माजी आमदार नितीन शिंदे, स्वाती ताई शिंदे, प्रकाश तात्या बीरजे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *