एमटीडीके शैक्षणिक संकुलात चित्रकला स्पर्धेला प्रतिसाद

0
mtdk

मिरज (प्रतिनिधी)
एमटीडीके शैक्षणिक संकुलाच्या वतीने बालदिनाचे औचित्य साधत जिल्हास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेस जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. चित्रांचे परीक्षण कला शिक्षक विजय कोळेकर, कला शिक्षिका सरिता माने, साकेत थोरात यांनी केले.

स्पर्धेचे उद्घाटन इंटरनॅशनल मॉडेल मेकर व कला शिक्षक रामचंद्र बलुरगी यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण तृप्ती पटवर्धन यांच्या हस्ते झाला. त्यांनी मुलांना पहिल्या, दुसऱ्या क्रमांकाच्या संकल्पनेत न अडकता स्पर्धेचा आनंद घ्या, प्रत्येक सहभाग महत्त्वाचा असल्याचा संदेश दिला. सरीता माने यांनी मुलांचे कौतुक केले.

यशस्वी विद्यार्थी : अंशिका माळी, सृष्टी चंदनवाले, श्रीशा गवळी, स्वरा पाटील, लकी पुलुमुजू, आराध्या पाटील, मल्हार शिरसाठ, सान्वी सुरेश देवखुळे, मरियम सादिक काझी, शराज्ञा नितीन झेंडे, अंकिता गुंडप्पा मासाळ, गुंजन शेखर शिंदे. बेस्ट स्कूल ट्रॉफी आदर्श बालक मंदिर मिरज या स्कूलला मिळाली. स्पर्धेसाठी संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री आ. सुरेशभाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, मुख्याध्यापिका संगीता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. जनसंपर्क अधिकारी योगेश रोकडे, कला शिक्षक प्रसाद करलकर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *