संविधान मजबूत, देश मजबूत — डॉ. अजयनाथ थोरे

0
a6b0fe85b8024554a160b8d76ea4c941

सांगली / प्रतिनिधी
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने अमृत महोत्सवी संविधान दिन सांगली जिल्हा परिषद आवारातील महासंघ कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) डॉ. अजयनाथ थोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून राष्ट्रनिष्ठेची शपथ घेण्यात आली.
या प्रसंगी सर्व भारतीय नागरिकांना महासंघाच्या वतीने २६ नोव्हेंबर संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. थोरे म्हणाले, आज आपण त्या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करतो, ज्या दिवशी आपल्या राष्ट्राने लोकशाही, स्वातंत्र्य, समानता आणि न्याय या मूल्यांना संविधानाच्या रूपाने स्वीकारले. आपले संविधान हे केवळ एक ग्रंथ नसून प्रत्येक भारतीयाचे स्वप्न, अधिकार आणि जबाबदारी यांचे जिवंत प्रतीक आहे. या पवित्र दिवशी आपण संकल्प करूया—संविधानाचा आदर करूया, कर्तव्य, बंधुता आणि एकतेचा मार्ग स्वीकारूया. समाजात शांतता, समानता आणि विकास घडवण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. ‘संविधान मजबूत – देश मजबूत’, भारतीय असण्याचा अभिमान सदैव हृदयात ठेवूया.
कार्यक्रमाला कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अनेक पदाधिकारी व विविध विभागातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यात सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन) कृष्णा माळी, सहायक प्रशासन अधिकारी गणेश फड, महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश मडावी, अतिरिक्त चिटणीस डॉ. बाळासाहेब व्हनखंडे, जिल्हा सचिव बाबासाहेब माने, जिल्हा परिषद शाखा जिल्हाध्यक्ष दीपक बनसोडे, पाटबंधारे विभाग जिल्हाध्यक्ष राजू कलकुटगी, वाहन चालक संघटना जिल्हाध्यक्ष संभाजी ढोबळे, महानगरपालिका अध्यक्ष माधवानंद बागडे, सिव्हिल हॉस्पिटल शाखा अध्यक्ष अमोल मांजर्डेकर, तसेच सुलोचना खंदारे, चंद्रकांत नागरगोजे, शिवाजी जोशी, गणेश पवार, अनिल धनवडे, भीमराव नाकाडे, नरसिंह कुंभार, मोहन सल्लावार, बापू कोळी, सिद्राम कोळी, महेश विभुते, आर.टी. बागुल, के.बी. डुकरे, पंकज बनसोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघ पदाधिकाऱ्यांनी केले असून शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

——-

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य, संलग्न सर्व शाखा वतीने संविधान सन्मान अमृत महोत्सव – पुणे विभागीय मेळावा माहे जानेवारी 2026 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सदर मेळाव्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, कला, पत्रकार,क्षेत्रातील व्यक्ती, साहित्यिक, उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी व उत्कृष्ट कर्मचारी आदी क्षेत्रातील व्यक्तींना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *