प्रियल कदम व नम्रता ओमासे यांची विद्यापीठ कबड्डी संघामध्ये निवड

0
IMG-20251127-WA0156

सांगली प्रतिनिधी
राजश्री छत्रपती शाहू कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय सांगली येथील खेळाडू चे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड येथे दिनांक ४ते८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या २७ व्या आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कबड्डी संघामध्ये प्रियल कदम व नम्रता ओमासे यांची निवड व महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक किशोर चंदुरे यांची विद्यापीठ महिला वलिबॉल प्रशिक्षक पदी निवड झाल्याबद्दल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी सांगली येथील, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ विश्राम लोमटे, लाईफ मेंबर डॉ सचिन खेडेकर, स्थानिक व्यवस्थापन समिती काऊन्सिल सदस्य श्री रवींद्र ब्रह्मनाळकर,प्रभारी प्राचार्य डॉ. अर्चना शिंदे यांचे कडून अभिनंद करण्यात आले, महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *