५ व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये रयतच्या शाहू कॉलेजच्या विद्यार्थिनीस फ्रीस्टाइल कुस्ती मध्ये कांस्य
विद्यार्थिनी सृष्टी जयवंत भोसले
कोल्हापूर (प्रतिनिधी) राजस्थान येथील लोहागर स्टेडियम येथे सुरू असलेल्या ५ व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कदमवाडी रोड कोल्हापूरची विद्यार्थिनी सृष्टी जयवंत भोसले हिने ६५ किलो वजन गटांमध्ये फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात कांस्य पदक पटकावले. तिला शिवाजी विद्यापीठ संघाचे संघ व्यवस्थापक व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विक्रमसिंह नांगरे यांचे मार्गदर्शन लाभले.
सृष्टी भोसले हीला रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मा. सरोज पाटील (माई) महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन तथा जनरल बॉडी सदस्या सौ. संगीता प्रशांत पाटील, जनरल बॉडी सदस्य मा. प्रशांत पाटील, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन लाभले.


