कुंभी कासारी साखर कारखान्याच्या चालू हंगामातील साखर पोत्याचे पूजन
कारखान्याचे संचालक अँड. बाजीराव शेलार,संजय पाटील, विश्वास पाटील, विलास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
कोपार्डे. (प्रतिनिधी) कुंभी कासारी साखर कारखान्याच्या मिल विभागाचे गाळप विस्तारिकरण पूर्ण झाले आहे. या हंगामाची सुरुवात ६ हजार ५०० मे.टन प्रतिदिन ऊसगळप केले जाणार आहे.जवळपास सर्वच विभागाच्या विस्तारिकरणाचे काम पूर्ण होत आहे असे आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले.
गुरुवारी हंगाम २०२५/२६ मधील पहिल्या साखर पोत्याचे पूजन आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष राहूल खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यावेळी बोलताना आमदार नरके म्हणाले साखर उत्पादन खर्च आणि विक्री दर यात समानता निर्माण झाली आहे. साखर कारखाने उद्योग म्हणून वाचविण्यासाठी केंद्राने साखरेचा किमान विक्री दर ४२ रूपये किलो करावा अशी मागणी केली.कुंभी कासारीचे विस्तारिकरणाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसात ५ हजार टनावरून ६ हजार ५०० वर प्रतिदिनी गाळप क्षमता तयार आहे.मिल चे गाळप विस्तारिकरण ८ हजार मे.टन केले आहे. पण बॉयलिंग हाऊस व उत्पादन विभागाची काही तांत्रिक येत्या कामे १५ दिवसात पूर्ण होणार आहेत. सध्या प्रतिदिन ५ हजार ते ५ हजार २०० ने ऊस गाळप सुरु आहे. साखर उतारा १०.५१ आहे असे सांगितले.
यावेळी कारखान्याचे संचालक अँड. बाजीराव शेलार,संजय पाटील, विश्वास पाटील विलास पाटील,दादासो लाड,सर्जेराव हुजरे, किशोर पाटील, अनिष पाटील, राऊ पाटील,प्रकाश पाटील,पी.डी.पाटील,उत्तम वरूटे,बळवंत करचे,प्रमिला पाटील,झधनश्री पाटील,प्रा.बी.बी.पाटील,रवि मडके,कामगार प्रतिनिधी नामदेव पाटील, दिपक चौगले, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने सेक्रेटरी प्रशांत पाटील, चिफ केमिस्ट प्रकाश पाटील अधिकारी, कर्मचारी विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.


