राष्ट्रीय पॅरा स्विमिंग स्पर्धेतअन्नपूर्णा सुनील कांबळे हिने रौप्य व कांस्य पदक पटकवले…
५० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात रौप्य तर ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये कांस्य
कोल्हापूर (प्रतिनिधी) हैद्राबाद ह्या ठिकाणी संपन्न झालेल्या २५ व्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजची विद्यार्थिनी अन्नपूर्णा सुनील कांबळे हिने ५० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात रौप्य पदक व ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये कांस्य पदक मिळवले.
ह्या विद्यार्थिनीला रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मा. सरोज पाटील (माई) महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन तथा जनरल बॉडी सदस्या सौ. संगीता प्रशांत पाटील, जनरल बॉडी सदस्य मा. प्रशांत पाटील, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विक्रमसिंह नांगरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रोत्साहन लाभले.


