राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज चे विभागस्तरीय युनिफाईट स्पर्धेत घवघवीत यश

0
राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज चे विभागस्तरीय युनिफाईट स्पर्धेत घवघवीत यश

रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज पाटील (माई) यांनी अभिनंदन केले

कोल्हापूर (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा व युनिफाईट वेल्फेअर असोसिएशन, सातारा यांच्यावतीने आयोजित कोल्हापूर विभागीय युनिफाईट क्रीडा स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजचा इयत्ता 12 वी सायन्स चा विद्यार्थी प्रेम संदिप कांबळे याने 48 किलो वयोगटात व इयत्ता 12 वी कलेचा विद्यार्थी आयुष रंगराव यमकर बाने 45 किलो वयोगटात गोल्ड मेडल संपादन केले.

त्याच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज पाटील (माई), स्थानिक व्यवस्थापन कमिटीच्या चेअरमन सौ. संगीता प्रशांत पाटील, सदस्य मा.श्री.प्रशांत पाटील, महाविध्यालायाचे प्राचार्य प्रो.डॉ.डी.आर. भोसले, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा.डी.एम. गायकवाड, ज्युनिअर कॉलेज च्या उपप्राचार्या सौ. एल. बी. चव्हाण मॅडम यांनी अभिनंदन केले. ज्युनिअर कॉलेज विभागाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अभिनंदन कौलगे यांनी मार्गदर्शन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *