राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज मध्ये विज्ञान व वाणिज्य प्रदर्शनाचे आयोजन.
अकाउंट व गणितीय आकृत्यांच्या रांगोळी स्पर्धा आयोजीत
कोल्हापूर ता.24(प्रतिनिधी) येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज मध्ये गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त अकाउंट व गणितीय आकृत्यांच्या रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या व सायन्स विभागामार्फत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच कॉमर्स विभागामार्फत वाणिज्य-प्रदर्शनचेही आयोजन करण्यात आले होते.
या रांगोळी स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन व वाणिज्य प्रदर्शन चे उद्घाटन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो.डॉ. डी. आर. भोसले यांचे हस्ते संपन्न झाले यावेळी रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा.डी.एम. गायकवाड, ज्युनिअर कॉलेज विभागाच्या उपप्राचार्या सौ.एल.बी. चव्हाण, ज्युनिअर विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
रांगोळी स्पर्धेचे नियोजन गणित विभागाच्या प्रमुख प्रा.एस.एस.पाटील मॅडम, व सौ.एम.डी.पाटील यांनी केले. कॉमर्स विभागाच्या एक्सीबीशनचे नियोजन कॉमर्स विभागच्या प्रमुख प्रा.जे.ए. कांबळे मॅडम यांनी केले तर विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन प्रा.पी.एच. कांबळे व प्रा.स्नेहा पाटील मॅडम यांनी केले. विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण सिनीयर कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रा.आर.टी. पाटील यांनी केले तर रांगोळी स्पर्धेचे परीक्षण प्रा.प्राजक्ता कांबळे मॅडम यांनी केले. कॉमर्स एक्सीबीशनचे परीक्षण डॉ.बी. वाय. सायमोते व प्रा. आर. एस. राणेसंकपाळ यांनी केले.



