राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न
स्पर्धेस रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा.डी.एम. गायकवाड उपस्थित होते
कोल्हापूर(प्रतिनिधी) येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये शुक्रवार दि. 19 व 20 डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे उदघाटन वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल उबाळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी ज्युनिअर कॉलेज विभागाच्या उपप्राचार्या सौ.एल.बी. चव्हाण प्रमुख उपस्थित होत्या पहिल्या दिवशी 100 व 200 मी. धावणे, गोळा, थाळी, भाला फेक, लांब उडी या मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या तर दुसन्या दिवशी बास्केटबॉल, कबड्डी या सांघिक स्पर्धा घेण्यात आल्या
बक्षिस वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.डी. आर. भोसले साहेब उपस्थित होते तर कार्यक्रमास कोल्हापूर प्राथमिक शिक्षण मंडळाचे क्रीडा निरीक्षक सचिन पांडव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सचिन पांडव यांनी राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज म्हणजे कबड्डीची पंढरी असून कॉलेजची हिच ओळख कायम रहावी यासाठी खेळाडू व प्रशिक्षकांनी प्रयन्त करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रो. डॉ.डी. भोसले यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की, खेळाडूनी सरावात सातत्य ठेवल्यास नक्की यश मिळते राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये खेळांडूसाठी आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव, भव्य क्रीडांगण, बास्केटबॉल कोर्ट इ.बऱ्याच सुविधा उपलब्ध आहेत त्या सुविधांचा फायदा घ्यावा व स्पोर्ट्समध्ये करिअर करावे,
स्वागत व प्रास्ताविक ज्युनिअर कॉलेजचे क्रीडाशिक्षक प्रा. अभिनंदन कौलगे यांनी केले. आभार मराठीचे जेष्ठ प्राध्यापक के. आर. पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. एम जे. थोरात यांनी केले.विजेत्या स्पर्धकाना गोल्ड, सिल्वर व ब्राँझ मेडल देण्यात आले. स्पर्धेस रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा.डी.एम. गायकवाड उपस्थित होते, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्युनिअर कॉलेज क्रीडाशिक्षक प्रा. अभिनंदन कौलगे, वरिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विक्रम नांगरे-पाटील व सर्व ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी कष्ट घेतले.



