क्रीडा विभागाकडून कमला कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा
मिनी गोल्फ मधील नॉकआउट दुहेरी स्ट्रोक या प्रकारात कामगिरी
नागपूर येथील वसंतराव नाईक शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय, सीताबर्डी, नागपूर येथे दि.०३ जानेवारी ते ०८ जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या ११ व्या ज्युनियर (मुले आणि मुलींची राष्ट्रीय मिनीगोल्फ चॅम्पियनशिप (स्ट्रोक, नॉकआउट मिनीगोल्फ) २०२५-२६ या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कमला कॉलेज, कोल्हापूर मधील कनिष्ठ विभागातील खेळाडू
कु.संचिता सावंत व कु. प्रणाली ढाले (दोघीही बारावी कॉमर्स) यांनी मिनी गोल्फ मधील नॉकआउट दुहेरी स्ट्रोक या प्रकारात रौप्य पदक पटकावले.


