एनसीसी ‘C’ प्रमाणपत्र परीक्षा 2025–26 पार पडली.

0
1000273250

5 केंद्रांवर 1790 कॅडेट्स सहभागी”

कोल्हापूर (प्रतिनिधी) राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), ग्रुप मुख्यालय कोल्हापूर यांच्या वतीने एनसीसी ‘C’ प्रमाणपत्र परीक्षा 2025–26 ही यशस्वीपणे पार पडली. सदर परीक्षेसाठी सीनियर डिव्हिजन (SD) – (मुले) आणि सीनियर विंग (SW) – (मुली) अशा एकूण 1790 एनसीसी कॅडेट्सनी सहभाग नोंदविला. ही परीक्षा कोल्हापूर ग्रुपअंतर्गत पाच नियुक्त परीक्षा केंद्रांवर पार पडली.

   या परीक्षेअंतर्गत 14 फेब्रुवारी 2026 रोजी प्रात्यक्षिक (Practical) परीक्षा, तर 15 फेब्रुवारी 2026 रोजी लेखी (Written) परीक्षा घेण्यात आली. ‘C’ प्रमाणपत्र परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर घेतली जाते. यापैकी ‘C’ प्रमाणपत्र ही एनसीसीमधील सर्वोच्च व अंतिम परीक्षा मानली जाते.

  या परीक्षेमध्ये कॅडेट्सचे ड्रिल, शस्त्र प्रशिक्षण, नकाशा वाचन, फील्ड क्राफ्ट, आरोग्य व स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management), राष्ट्रीय एकात्मता, समाजसेवा, पर्यावरण जागरूकता व संवर्धन, व्यक्तिमत्त्व विकास तसेच नेतृत्वगुण अशा विविध प्रशिक्षण घटकांवर मूल्यांकन करण्यात आले.

एनसीसी ‘C’ प्रमाणपत्र प्राप्त कॅडेट्सना विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे लाभ मिळतात. विशेषतः भारतीय सैन्य, नौदल व वायुसेनेतील SSB मार्फत थेट अधिकारी प्रवेश, तसेच विविध केंद्र व राज्य शासनाच्या पदभरती प्रक्रियेत अतिरिक्त गुण/प्राधान्य, संरक्षण व पोलीस सेवांमधील संधी विद्यार्थांना मिळते. त्यामुळे या परीक्षेला विशेष महत्व आहेे.

परीक्षा एनसीसी ग्रुप कमांडर, ब्रिगेडियर आर. के. पैठणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी उप-ग्रुप कमांडर कर्नल अणूप सिंग तसेच प्रशिक्षण अधिकारी लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई यांच्या समन्वयाने सर्व केंद्रांवर आवश्यक व्यवस्था करण्यात आली. परीक्षा न्याय्य, शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी अधिकारी, एएनओ, जीसीआय, पीआय स्टाफ तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *