कमला कॉलेज मध्ये नशा मुक्त भारत शपथ उपक्रम

0
1000274682

प्रा. डॉ. सुजय पाटील यांनी नशा मुक्त भारत ची शपथ सर्वांना दिली.

कोल्हापूर. (प्रतिनिधी) कमला कॉलेज मध्ये ‘नशा मुक्त भारत अभियान’ अंतर्गत नशामुक्तीची शपथ विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांना देण्यात आली. प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झाला.

  राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सुजय पाटील यांनी ‘नशा मुक्त भारत अभियानाची’ माहिती देऊन तरुणांनी पानमसाला, मावा, गुटखा, दारू, अफू चरस गांजा, बेकायदेशीर औषधे यांच्या सेवनापासून दूर रहावे असे आवाहन केले व ‘नशा मुक्त भारत’ ची शपथ सर्वांना दिली.

  याप्रसंगी विद्यार्थिनी व शिक्षकेतर सेवक तसेच प्रा. डॉ. विश्वनाथ तराळ, प्रा. डॉ. तानाजी घागरे, प्रा. श्रीमती स्वाती कांबळे, प्रा. डॉ. प्रवीण चौगले, प्रा. श्रीमती अश्विनी कुंभार, प्रा. श्रीमती पूजा पाटील, प्रा. श्रीमती चिन्मय सांगळे, प्रा. श्रीमती सारिका घाटे इ. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *