बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनीचा मृत्यू

0

चिक्कोडी,ता.28(प्रतिनिधी)-
बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनीला ऱ्हदाविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदय द्रावक घटना शनिवारी 28 रोजी सकाळी बंबलवाड (ता.चिक्कोडी) येथे घडली आहे.भूमिका माळंगी (वय 17) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे.
चिक्कोडी शहरातील चिंचणीच्या पदवी पूर्व कॉलेजमध्ये द्वितीय पियुसी वर्षात शिकत होती.आज शनिवारी पहिला पेपर असल्याने परीक्षेसाठी जाण्यासाठी पहाटे सकाळी लवकर उठून अभ्यास देखील केला.त्यानंतर अंघोळ करून परीक्षा केंद्राकडे जाण्यासाठी तयार होत असताना अचानक तिला हार्ट अटॅक आला.तातडीने कुटुंबातील सदस्यांनी दवाखान्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला.आपल्या उज्वल भविष्यासाठी बारावीची परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तालुक्यासह, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर या घटनेविषयी चिक्कोडीच्या खासदार प्रियंका जारकीहोळी, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह, विविध नागरिकांनी शोक व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *