बळीराजा इंटरनॅशनल स्कूल गंगापूर येथील विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया
कुर ता-19(वार्ताहर)
भुदरगड तालुक्यातील गंगापूर येथील बळीराजा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सन 2026- 27 या शैक्षणिक वर्षासाठी लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ निवडणुका घेण्यात आल्या. देशातील निवडणूक प्रक्रिया शालेय वयात समजावी यासाठी उमेदवारी अर्ज मागवण्यापासून ते निकाल लागेपर्यंतच्या सर्व बाबी अनुभवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला या निवडणुकीत इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून सहभाग नोंदविला .
वर्ग प्रतिनिधी या पदासाठी पाचवी ते बारावीच्या एकूण 23 उमेदवारांनी व विद्यार्थी प्रतिनिधी पदासाठी 3 व विद्यार्थिनी प्रतिनिधी पदासाठी 2 अशा 28 उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागविणे ,अर्ज दाखल ,छाननी, माघार ,मतपत्रिका तयार करणे, प्रत्यक्ष मतदाना दिवशी गुप्त मतदान घेण्यात आले केंद्राध्यक्ष ,मतदान अधिकारी यांनी सर्व कर्तव्य पार पाडले तसेच मतमोजणीनंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला इयत्ता बारावी सायन्सचा विद्यार्थी रेहान सनदी याची विद्यार्थी प्रतिनिधी तर समृद्धी अंगच हिची विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निवड झाली
ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी बळीराजा संकुलाचे संस्थापक अध्यक्ष अजित जाधव ,अध्यक्षा केतकी जाधव यांचे प्रोत्साहन लाभले प्राचार्य.दयाली पाटील, जिमखाना प्रमुख अध्यापक अशोक पालकर, अध्यापक जीवन ढेरे, यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या सहभागाने निवडणूक यशस्वीरित्या पार पडली.


