श्रीपेवाडी इलेक्ट्रोसल कंपनीचा एमएसएमई पुरस्काराने सन्मान
निपाणी,ता.28(प्रतिनिधी)-
श्रीपेवाडी येथील इलेक्ट्रोसल हायटेक प्रा.लि. कंपनीचा बेळगाव येथे लघुउद्योग संघटनेकडून एमएसएमई पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
श्रीपेवाडी ता.निपाणी येथे इलेक्ट्रोसल कंपनी सन-2013 पासून इलेक्ट्रॉनिक्स मधील विविध उत्पादन क्षेत्रामध्ये यशस्वीपणे काम करीत आहे.या कंपनीने या क्षेत्रात उत्कृष्ट काम केले असून याची दखल घेऊन या कंपनीला बेळगाव जिल्हा लघुउद्योग संघटनेने सदरचा पुरस्कार प्रदान केला आहे.या कंपनीने उत्कृष्ट प्रगती केली असून कंपनीने रोजगार निर्माण केला आहे.तसेच विदेशात या कंपनीचे ग्राहक आहेत.
बेळगाव येथे कंपनीचे डायरेक्टर तुळशीदास साळुंखे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.याप्रसंगी किर्लोस्कर कंपनीचे कार्यकारी संचालक आर.व्ही.गुमास्ते,मधुरा स्टील कोल्हापूरचे चेअरमन चंद्रशेखर डोली, डीआयसी बेळगावचे सत्यनारायण भट, एकेसी ग्रुप बेळगावचे राम भंडारे, बीडीएसएसआयचे अध्यक्ष नितीन लांडगे, बीएमटीसी अध्यक्ष सतीश नेर्लेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


